हरतालिका व्रत पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या तृतिया तिथीला साजरं केलं जातं.
या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर प्राप्त होण्यासाठी भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची पूजा करतात.
यावर्षी हरतालिका व्रत 6 सप्टेंबर 2024 ला साजरा करण्यात येणार आहे.
हरतालिका व्रताचे नियम आपण पाहूया.
हरतालिका व्रताच्या दरम्यान जर मासिक धर्म आला तर उपवास करावा मात्र देवाला लांबूनच नमस्कार करून दुसऱ्या व्यक्तीकडून कथेच श्रवण करावं.
हरतालिका व्रत वर्षातून एकदा केल जातं आणि मध्येच सोडता येत नाही.
हरतालिका व्रताचा एक खास नियम असा आहे की या दिवशी जागरण करून पूजन करणे अधिक फलदायी मानलं जातं.
हे व्रत करणाऱ्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं. अन्यथा व्रताचं पुण्य लाभत मिळत नाही.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)