दिवाळीच्या दिवशी चुकूनही गोष्टी दान करु नका; अन्यथा हवाल कंगाल
दिवाळीच्या दिवशी दान धर्माला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.
दिवाळीत विशेष गोष्टी दान केल्याने तुम्हावर आर्थिक संकट कोसळू शकतं.
दिवाळीच्या दिवशी तेल आणि तूप दान करणे टाळावे. या दिवशी अग्नीला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टींशी व्यवहार करणे अशुभ मानले जाते.
दिवाळीच्या दिवशी मीठ दान करू नये. असे मानले जाते की दिवाळीला मीठ दान केल्याने नात्यात दुरावा येतो.
दिवाळीच्या दिवशी किंवा संध्याकाळी पैशाचे व्यवहार करणे शुभ मानले जात नाही. दिवाळीत कोणाचीही देणी देऊ नयेत. असे केल्याने देवी लक्ष्मीला घरातून निरोप दिला जातो.
लोखंडी गोष्टी दुर्दैव आणि आपत्तीला आकर्षित करतात. तसेच लोखंडाचा संबंध राहूशी मानला जातो, त्यामुळे दिवाळीच्या दिवशी या वस्तूंचे दान करू नये.
दिवाळीच्या दिवशी काळ्या वस्तू दान करू नयेत. तीक्ष्ण वस्तू नकारात्मकता आणि दुर्दैवाला प्रोत्साहन देतात.
तुटलेल्या गोष्टी अपयश आणि दुर्दैव आकर्षित करतात. अशा परिस्थितीत दिवाळीला तुटलेल्या किंवा तडकलेल्या वस्तू दान करू नका.
दिवाळीच्या दिवशी धान्य, कपडे, फळे आणि मिठाई दान करावी.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)