गंगा दशहरानिमित्त 'या' गोष्टींचं करा दान!

या दिवशी गंगेमध्ये बऱ्याच गोष्टींच दान केलं जातं. शास्त्रानुसार या दिवशी गंगेची पूजा करणे खूप महत्वाचे मानले जाते.

ज्योतिषाचार्य पंडित मुकेश शर्मा यांनी पंचांगानुसार असे सांगितले आहे की, ज्येष्ठ शुक्ल पक्ष दशमी 15-16 जूनच्या रात्री 2:32 मिनिटांनी सुरू होईल.

शास्त्रानुसार या दिवशी दान करण्याला विशेष महत्व आहे. असे म्हटले जाते की या दिवशी दान केल्याने व्यक्तीला सर्व संकटापासून आणि ग्रह दोषांपासून मुक्तता मिळते.

गंगा दशहराला 'या' गोष्टींच दान करण ठरतं पुण्याच

शुभ्र वस्त्र

असे मानले जाते की, या दिवशी पांढरे वस्त्र दान केल्याने संपत्ती वाढते.

शृंगार

या दिवशी विवाहीत महिलांना शृंगारदान केल्याने विवाहित जीवन सुखी राहते.

अन्न

अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं.शास्त्रानुसार या दिवशी अन्नदान करणे शुभ असतं. यामुळे पुण्य प्राप्त होते.

फळं

यादिवशी हंगामी फळं दान केल्याने व्यक्तीला शुभ फल प्राप्त होते.

VIEW ALL

Read Next Story