पुढल्या जन्मी द्रौपदीला 'या' पांडवाची पत्नी व्हायची होती इच्छा; मृत्यूआधी केलेला खुलासा

स्वयंवर आयोजित केलं होतं

महाभारतामधील कथेनुसार द्रौपदीच्या विवाहासाठी तिच्या वडिलांनी स्वयंवर आयोजित केलं होतं.

अर्जुनाने स्वयंवरामध्ये घेतला भाग

या स्वयंवरामध्ये पांडवांपैकी एक असलेल्या अर्जुनाने भाग घेतला आणि माशाचा डोळा फोडून स्वयंवराची अट पूर्ण करत द्रौपदीबरोबर लग्न केलं.

पाचही पांडवांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारलं

मात्र आई कुंतीला दिलेलं वचन आणि महाभारतीमधील कथानकानुसार द्रौपदीला पाचही पांडवांना पत्नी म्हणून स्वीकारावं लागलं.

पत्नी म्हणून सारी कर्तव्यं पार पाडली

द्रौपदीने पाचही पांडावांबरोबर अगदी प्रमाणिकपणे आपली पत्नी म्हणून सारी कर्तव्यं पार पाडली.

एक पांडव द्रौपदीवर फारच प्रेम करायचा

मात्र पाच पांडवांपैकी एक पांडव द्रौपदीवर फारच प्रेम करायचा. द्रौपदीलाही पुढील जन्मात पांडवांपैकी हाच नवरा म्हणून हवा होता.

शेवटच्या क्षणी व्यक्त केली इच्छा

महाभारताच्या कथेनुसार द्रौपदीचा मृत्यू समीप असताना तिने तिची शेवटची इच्छा म्हणूनच याच पांडावाशी पुढील जन्मी लग्न होऊ दे अशी इच्छा बोलून दाखवली होती.

द्रौपदीने घेतलं या पांडवाचं नाव

द्रौपदीने शेवटची इच्छा म्हणून, पुढील जन्मी मला भीमाची पत्नी व्हायचं आहे, अशी इच्छा व्यक्त केलेली. भीम द्रौपदीवर फार प्रेम करायचा.

असं म्हणतात की भीमाला...

असं म्हणतात की भीमाला द्रौपदीचा त्रास पहावयाचा नाही. तिचं दु:ख पाहून भीमाच्या डोळ्यात आश्रू यायचे.

सामाजिक मान्यतांवर आधारित माहिती

डिस्क्लेमर - येथे देण्यात आलेली सर्व माहिती धार्मिक आणि सामाजिक मान्यतांवर आधारित आहे. zee24tass.com याला दुजोरा देत नाही.

VIEW ALL

Read Next Story