Chanakya Niti : पती-पत्नीने दररोज करावं 'हे' काम; नात्यात येणार नाही दुरावा!

Jul 12,2023


ज्या घरात पती-पत्नीमध्ये समन्वय नसतो, त्या घरात लक्ष्मी वास करत नाही, असं म्हणतात.


संसारात पती-पत्नीने या काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी, याची माहिती चाणक्यांनी दिलीये.


आचार्य चाणक्यांच्या मते पती-पत्नीने एकमेकांचे मित्र असले पाहिजेत.


नातं सुंदर असतं जिथे प्रेमासोबतच आदरही असतो. त्यामुळे नेहमी एकमेकांचा आदर करा. एकमेकांच्या गरजा समजून घ्या.


असं असल्यास पती-पत्नीचे नातं आणखी घट्ट होतं.


आचार्य चाणक्य यांच्या मते पती-पत्नी ही वाहनाची दोन चाके आहेत. दोघांनी मिळून पुढे जायला हवे.


आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रामध्ये पती-पत्नीमध्ये काही रहस्य असलं पाहिजे असं सांगितलंय.


दोघांनीही लक्षात ठेवावं की, त्यांच्या वैयक्तिक गोष्टी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू नयेत, अन्यथा पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story