पितृपक्षात सोनं खरेदी करणं शुभ की अशुभ?
प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी माता-पिता आणि पूर्वजांना नमन करण्याचा विधी भारतीय संस्कृतीत आहे.
घर, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा शुभ कार्याच्या यशासाठी, पितरांचा आदर करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे अत्यंत आवश्यक आहे.
पितृपक्षामध्ये शुभ कार्य करण्यास मनाई असते.
नवीन कपडे घालणं, नव्या वस्तू खरेदी करणे इत्यादी गोष्टी देखील पितृपक्षात करू नयेत, असे मानले जाते.
पितृ पक्षाच्या 15 दिवसांमध्ये अष्टमी हा दिवस शुभ मानला जातो.
पितृपक्षामध्ये येणाऱ्या अष्टमीला देवी लक्ष्मीचे वरदान प्राप्त आहे.
या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं.
तसंच या दिवशी सोनं खरेदी केल्याने ते आठ पट वाढते, अशीही श्रद्धा आहे.
या दिवशी हत्तीवर विराजमान लक्ष्मीची पूजा करणे लाभदायक ठरते.
लग्नाच्या खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)