Rakshabandhan 2024: रामायण, महाभारतातील भावा बहिणीच्या जोड्या

Aug 17,2024


यावर्षी रक्षाबंधन 19 ऑगस्टला साजर केला जाणार आहे.


रक्षाबंधन हा भावा बहिणीचा पवित्र सण म्हणून साजरा केला जातो. जाणून घेऊया भावा बहिणींच्या अशा काही जोड्या ज्या आजही आहेत आदर्श..

शूर्पणखा आणि रावण

रावणाला जेव्हा त्याची बहिण शूर्पणखेचं नाक श्रीरामाचा भाऊ लक्ष्मणाने कापल्याचं समजलं तेव्हा बहिणीच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने सीतेचं अपहरण केलं.

दुशला आणि पांडव

दुशला गांधारीची एकुलती एक मुलगी होती. गांधारीला कौरव हे शंभर पुत्र देखील होते. तरी देखील कौरवांपेक्षा तिचं जास्त प्रेम पांडवांवर होतं.

द्रौपदी आणि कृष्ण

द्रौपदी आणि कृष्णाचं नातं खूप सुंदर होत. एकदा कृष्णाला ईजा झाली असता द्रौपदीने आपले भरजरी वस्त्र फाडून कृष्णाच्या मनगटावर बांधलं. त्याबदल्यात कृष्णाने वस्त्रहरणाच्या वेळेस तिची मदत केली. तेव्हापासून रक्षाबंधनाच्या प्रथेला सुरूवात झाली.

सुभद्रा आणि कृष्ण

जगन्नाथ मंदिरात आजही कृष्ण आणि बलरामासोबत त्यांची बहिण सुभद्रेची पूजा केली जाते.

शांता आणि राम

शांता दशरथ आणि कौशल्या यांची पहिली कन्या होती. शांता आपल्या भावांसाठी होणाऱ्या यज्ञात सहभागी झाली. ज्यामुळे तिच्या भावांचा जन्म झाला.

Disclaimer

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story