तुम्हाला सकाळी सकाळी उंदीरमामा दिसला?

जाणून घ्या शुभ-अशुभ संकेत

उंदीर हा गणरायाचा वाहक आहे. घरात गणरायाचं आगमन झालं की मूर्तीसोबत उंदीरमामाचीही प्रतिष्ठापना केली जाते.

उंदीरमामा सकाळी सकाळी दिसला की हे शुभ संकेत आहे की अशुभ याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर दिसला तर या वेळी त्याला मारण्याची चूक करू नका, तर त्याला घरातून हाकलण्याचा प्रयत्न करा.

असं म्हणतात की, गणेश बुद्धीची देवता आहे. अशा स्थितीत उंदीर दिसला की घरात राहणाऱ्या लोकांची बुद्धी भ्रष्ट होत असते असं म्हणतात.

उंदीर घरात नकारात्मकता आणतो. उंदराला नकारात्मकतेचे प्रतीक देखील म्हटलं जातं. अशा स्थितीत गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर दिसणं अत्यंत अशुभ मानलं जातं.

गणेश चतुर्थीच्या दिवशी जर उंदीर घराबाहेर जाताना दिसला तर त्याचा अर्थ असा होतो की उंदीर तुमच्या घरातील सर्व गरिबी दूर करून घरात सुख-समृद्धी आणतोय.

जर सकाळी उंदीर दिसला तर याचा अर्थ तुमची महत्त्वाची काम बिघडू शकतात.

जर तुम्हाला पांढरा उंदीर दिसला तर तो खूप शुभ मानला जातो.पांढरा उंदीर सकारात्मकतेचं प्रतीक आहे. याशिवाय घरातील सर्व संकटे दूर करू शकतात.

जर तुम्हाला घरात मेलेला उंदीर दिसला तर भगवान गणेश तुमच्यावर एखाद्या गोष्टीसाठी रागावला आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story