Morning Tips : सकाळ प्रसन्न असेल तर दिवसभर प्रसन्नता कायम टिकून राहते. त्यामुळे सकाळी उठून अशी कोणतीही कामे करु नका ज्यामुळे तुमचा दिवस कंटाळवाणा जाईल. याचा तुमच्यावर मोठा परिणाम होतो.
सकाळचे वातावरण नेहमी प्रसन्नता वाढवणारे असले पाहिजे. त्यामुळे उठल्यानंतर कोणाशी वाद घालू नका. यामुळे दिवसभर तुमचा मू़ड खराब राहील.
तसेच सकाळच्या वेळेस नाश्ता घेताना अधिक मसालेदार खाणे टाळा. हलका आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे.
सकाळी उठल्या उठल्या घरातील बंद घड्याळ पाहणे हे तुमच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा ठरु शकते.
ज्योतिष शास्त्रानुसार सकाळी उठल्यावर आरसा पाहण्याची चूक करु नका. सकाळी आसरा पाहिल्यानंतर अनेक कामे बिघडण्याची शक्यता असते.
सकाळी अंथरुनातून उठल्यानंतर फुटकी किंवा तुटलेली मूर्ती पाहू नका. यामुळे कुटुंबात कहल निर्माण होऊन अंतर पडते.
सकाळी उठल्यानंतर घरातील न घासलेली भांडी पाहू नयेत. यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो आणि वास्तू दोष होतो.
ज्योतिष शास्त्रानुसार सकाळी अंथरुनातून उठल्यावर कोणताही हिंस्त्र प्राणी किंवा पक्षी पाहणे चुकीचे आहे. यामुळे घरी आणि ऑफिसमध्ये वाद-विवाद होतात.