पैशांची चणचण, कर्जमुक्तीची सुवर्णसंधी! 12 ऑगस्टला करा 'हे' काम
अधिक मासाताली परमा एकादशी अतिशय खास आहे. ही एकादशी 3 वर्षांतून एकदा येते.
अधिक मास आणि परमा एकादशी हे विष्णूला समर्पित केली आहे. असं म्हणतात ही एकादशी केल्याने सुख, सौभाग्य, संपत्ती, समृद्धी मिळते.
परमा एकादशी ही 12 ऑगस्टला असणार आहे. हे व्रत केल्यास गरीबीपासून मुक्तता होते अशी मान्यता आहे.
पैशाचं संकट तुमच्या आयुष्यातून घालविण्यासाठी एकादशीचं व्रत नियमाने केलं पाहिजे. या एकादशीच्या एक दिवस आधी फक्त सात्विक पदार्थांचं सेवन करावे.
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करा. त्यानंतर हातात फुलं व अक्षत घेऊन देवासमोर परमा एकादशीचं व्रत पाळण्याचा संकल्प घ्या. त्यानंतर विष्णूची विधीवत पूजा करा.
'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करत राहा आणि तुपाचा दिवा लावावा. परमा एकादशीच्या दिवशी दिवसभर फक्त फळांचं सेवन करा. या दिवशी ब्राह्मणाला दान करा.
चांगले वागा, कोणाला वाईट बोलू नका, वाईट विचार मनात आणू नका. विष्णु चालीसा, विष्णु सहस्रनामाचा पाठ करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)