अंकशास्त्रात प्रत्येक मूलांक संख्येची एक खासियत असते. 'या' मूलांकाची मुलं अभ्यासात खूपच हुशार असतात.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 या तारखेला जन्मलेल्या मुलांची मूलांक संख्या 3 असते.
मूलांक 3 हा स्वामी बृहस्पति देव म्हणजेच गुरु आहे. गुरु हा सर्व ग्रहांचा गुरु मानला जातो. 3 मूलांक असणारी मुलांचा मेंदू खूप तेज असतो.
हा मूलांक असणाऱ्या मुलांमध्ये खूप ज्ञान असते. ते मोठे झाल्यानंतर अनेक गोष्टी साध्य करून दाखवतात.
या मुलांना शिक्षण घेण्यासाठी भटकावे लागत नाही. ते सहज शिक्षण पूर्ण करतात. त्यासोबतच ते त्यांचा हेतू देखील पूर्ण करतात.
तर मूलांक 7 ची मुले ही अभ्यासामध्ये प्रचंड हुशार असतात. 7, 16, 25 तारखेला जन्मलेल्या मुलांचा मूलांक हा 7 असतो. ही मुळे संशोधन क्षेत्रात प्रसिद्ध होतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)