वास्तुशास्त्राची रचना ही भगवान ब्रह्मदेवानी लोकांच्या कल्याणासाठी केली आहे. ज्यामध्ये त्यांनी काही उपाय सांगितले आहेत.
जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर दर 24 तासांनी काही मिनिटे घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
घराबाहेर 1 वाटी पाणी 4 ते 5 तास सूर्यप्रकाशात ठेवा. त्यानंतर ते पाणी आंब्याच्या पानाने घरात शिंपडा.
संध्याकाळी मोठे मीठ घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवा. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी फेकून द्या.
जर तुमच्या देवघरात शंख असेल तर त्यामध्ये पाणी भरून ते संपूर्ण घरामध्ये शिंपडा.
तसेच दररोज तुमच्या घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. त्यामुळे घरात सकारात्मकता येते.