गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवण्याचं योग्य वय काय?
खरं तर प्रेमाला वयाची मर्यादा नसतं. कधी आणि कुठे तुमचं सूत जुळेल याची कल्पना अगदी तुम्हालाही नसते.
पण हल्ली शाळेत असतानाच मुलं प्रेमाच्या नात्यात गुंतात याचा परिणाम त्यांचा मानसिक आरोग्यावरही होतो आणि करिअरवरही.
मग नातेसंबंधासाठी योग्य वय कुठलं ? त्यावर सद्गुरू म्हणाले की, कोणत्याही गोष्टीची निश्चित वय नसतं. पण काय करावे आणि काय करु नये, हे मी सांगणार नाही.
पण जेव्हा तुम्हाला स्वतःशी नातेसंबंध जोडण्याची इच्छा किंवा गरज वाटते तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही नात्यामध्ये गुंतलं पाहिजे.
ट्रेंड आहे शाळा, कॉलेजात प्रेम संबंध असावे तर ही चुकीची गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.
त्यासाठी त्यांनी एक उदाहरण पण दिलं. ते म्हणाले की, आंबा पिकवणारा शेतकरी झाडाला लवकर फळं येऊ नये म्हणून सर्वपरी काळजी घेतो. कारण फळ आल्यावर झाडाची वाढ थांबत असते.
म्हणूनच शेतकरी झाडाच्या कळ्या काही वर्षे तोडतात, ज्यामुळे फळ येण्यास उशीर होता. यामुळे झाडाची पूर्ण वाढ आणि विकसित होतं. चांगलं विकसित झाडं चांगले फल देतो.