समोरची व्यक्ती खोटं बोलतंय का?

'या' 5 ट्रीकने पकडा त्यांचं खोटं

Aug 06,2023


खोटं बोलणाऱ्या व्यक्तींची कारणं वेगवेगळी असतात. पण तरीही असे काही लोक असतात ते वारंवार खोटं बोलत असतात. तेही अगदी कारणं नसतानाही.


या गोष्टीचा अनुभव कधी कामाच्या ठिकाणी येतो, तर कधी फ्रेंड सर्कलमध्ये येतो. काही जणांचं खोटं सहज पडकलं जातं. पण काही जण खोटे बोलण्यात पटाईत असतात. त्यांचं खोटं सहजा सहजी सापडत नाही.


आज आम्ही तुम्हाला असं काही पाच ट्रीक सांगणार आहोत, ज्यातून तुम्हाला अंदाज लावू शकता की समोरची व्यक्ती खोटे बोलत आहे की नाही.


खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याच्या पद्धतीवर तुम्ही लक्ष द्या. खोटे बोलताना त्यांची बोलण्याची पद्धती बदलेली असते, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.


बरेचदा खोटे बोलणारे लोक घाईघाईने बोलू लागतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला काही सांगेल तेव्हा त्याच्या बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या.


तज्ज्ञांच्या मतानुसार, जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलत आहे, तर त्याच्या कृतीकडे आणि त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्या.


जर त्याचे शब्द त्याच्या कृतीशी जुळत नसतील तर समोरची व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत असण्याची शक्यता आहे.


जर एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत असताना इकडे तिकडे पाहत असेल तर याचा अर्थ तो तुमच्याशी खोटं बोलत आहे.


एका अभ्यासात असंही आढळून आलं आहे की, खोटं बोलत असताना एखादी व्यक्ती उजवीकडून डावीकडे डोळे फिरवत असते.


तुमच्याशी बोलताना एखादी व्यक्ती वारंवार डोळे किंवा तोंड झाकत असेल तर तो खोटं बोलत असल्याची शक्यता आहे.


तज्ज्ञांच्या मते, एखादी व्यक्ती तुम्हाला काही बोलत असेल आणि त्यादरम्यान तुम्ही त्याला प्रश्न विचारला तर तो अस्वस्थ होतो. तुम्ही व्यक्तीच्या प्रतिक्रियेद्वारे अस्वस्थता ओळखू शकता.

VIEW ALL

Read Next Story