आमदार गणपत गायकवडांचा शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार

रिक्षा चालक ते केबल व्यावसायिक नंतर तीन टर्म आमदार अशी कारकिर्द असलेल्या आमदार गणपत गायकवाड यांच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. होय, मी गोळाबार केला. मला माझ्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही, असेही गणपत गायकवाडांनी म्हटलं.

गणपत गायकवाड विधानसभेत कल्याण पूर्व मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. 2009 मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा 24 हजार 486 मतांनी पराभव करत गायकवाड पहिल्यांदा आमदार झाले होते.

त्यावेळी गणपत गायकवाड यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या विधानसभा निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या, तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होती.

2014 मध्ये गणपत गायकवाड यांनी पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेना, भाजपची युती तुटली होती. या निवडणुकीत गायकवाड यांनी पुन्हा सेनेच्या उमेदवाराचा 745 मतांनी पराभव केला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढले. यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार धनंजय बोदारे यांचा 12,257 मतांनी पराभव केला.

तीन टर्म आमदार असलेल्या गणपत गायकवाड यांचे पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याचे सांगितले आहेत. गायकवाड मोठे उद्योजक असून त्यांचा मुलगा वैभव भाजपमध्ये कल्याण जिल्हा युवक अध्यक्ष पदावर आहे.

VIEW ALL

Read Next Story