पक्षांतराच्या चर्चा

who is Baba Siddiqui : इथं पक्षांतराच्या चर्चा होत असतानाच तिथं अनेकांनाच प्रश्न पडत आहे की, हे बाबा सिद्दीकी आहेत तरी कोण?

Feb 02,2024

मुळचे पाटण्याचे

मुळचे पाटण्याचे असणारे बाबा जियाउद्दीन सिद्दीकी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमुळं कायमच चर्चेत असतात. मुंबईतच नव्हे, तर पाटण्यातही त्यांची इफ्तार पार्टी चर्चेचा विषय ठरते.

कुटुंब

बाबा सिद्दीकी यांची मुलगी अर्शिया एक डॉक्टर आहे. तर, त्यांची पत्नी गृहिणी आहे. मुंबई काँग्रेसमधील मोठे नेते अशी ओळख असणाऱ्या बाबा सिद्दीकी यांचा वांद्रे पश्चिम मतदार संघावर दबदबा आहे.

राज्य मंत्रीपद

राज्य मंत्रीपद, महाराष्ट्र आवास आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबई विभागाचे अध्यक्षपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सुरु केली आणि पहिल्यांदाच ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

कलाजगताशी मैत्रीचं नातं

आज ज्या बाबा सिद्दीकी यांचं संपूर्ण कलाजगताशी मैत्रीचं नातं आहे त्याच बाबा सिद्दीकी यांचे वडील वांद्र्यातच वॉच मेकर असं काम करत होते. तेसुद्धा वडिलांना या कामात मदत करायचे. पण, शिक्षणाच्या दरम्यानच त्यांना राजकारणात रस वाटू लागला आणि त्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.

सलमान आणि शाहरुख खानमध्ये समेट

बाबा सिद्दीकी ही तिच व्यक्ती आहे, ज्यांच्यामुळं सलमान आणि शाहरुख खानमध्ये असणारा अनेक वर्षांचा दुरावा मिटून या मित्रांमध्ये पुन्हा एकदा मैत्री झाली होती.

अजित पवार गटात?

फक्त सलमान शाहरुखच नव्हे, तर अनेक सेलिब्रिटींमधील मतभेद बाबा सिद्दीकी यांच्यामुळं मिटले असंही म्हटलं जातं. असं हे नाव आता खरंच अजित पवार गटाची वाट धरतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIEW ALL

Read Next Story