मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल लागला असून यात आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे वरचष्मा पाहायला मिळतोय.
पण सिनेट म्हणजे काय? निवडून आलेल्या सदस्यांकडे काय जबाबदारी असते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सिनेटला अधिसभा असे म्हणतात. ज्याप्रमाणे विधीमंडळात विधानसभा असते, तिथं कायदे-धोरणं ठरवली जातात. तसेच विद्यापीठाच्या अधिसभेत 41 सिनेट सदस्य असतात.
निवडून आलेले सदस्य विद्यापीठाचे नियम ठरविणे, विद्यापीठाची फी, आर्थिक बजेट ठरविणे, धोरण ठरविण्यात सहभाग घेतात.
41 पैकी 10 सदस्य हे पदवीधरांकडून निवडले जातात. 10 सदस्य महाविद्यालयांतल्या प्राध्यापकांकडून, 10 सदस्य प्राचार्यांकडून निवडले जातात.
6 सदस्य संस्थाचालकांकडून तर 3 सदस्य विद्यापीठातल्या अध्यापक गटाकडून निवडले जातात.
विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष आणि सचिव असे २ सदस्य असतात.
सिनेट निवडणूक दर पाच वर्षांनी होत असते.
विद्यार्थी परिषद अध्यक्ष, सचिव पद या दोन जागांसाठी दरवर्षी निवडणूक होते. उर्वरित 39 सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. यासाठी वेगवेगळे पॅनल उभे केले जातात.
निवडणुकीत विजयी झालेल्यांपैकी प्रत्येक गटातून दोन सदस्यांना मॅनेजमेंट काऊन्सिंलसाठी निवडून दिले जातात. हे मॅनेजमेंट काऊंन्सिल म्हणजे त्यांचे विद्यापीठाचे मंत्रिमंडळच असते. या मंत्रिमंडळाच्या धोरणांनुसार सिनेटचे कार्य चालते.