रविवारी दक्षिण मुंबईत टाटा मॅरेथॉन 2024 चे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सात प्रकारच्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलं होतं.
यामध्ये फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 किमी मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन एलिट चॅम्पियन्स विथ डिसेबिलिटी, रन सीनियर सिटीझन रन आणि ड्रीम रन या प्रकारांचा समावेश होता.
या मॅरेथॉनमध्ये एकूण 59,515 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात मुख्य मॅरेथॉनमध्ये 9724 पुरुष तर 987 महिलांचा समावेश होता. तर अर्ध मॅरेथॉनमध्ये 12322 पुरुष तर 2896 महिलांचा समावेश होता.
10 किलोमीटरच्या स्पर्धेत 4140 पुरुष तर 2990 महिलांनी भाग घेतला होता. ड्रीम रन या स्पर्धेसाठी 12390 पुरुष तर 8200 महिलांनी सहभाग घेतला होता. तर वृद्धांमध्ये 1010 पुरुष तर 722 महिलांनी सहभाग घेतला
टाटा मुंबई मॅरेथॉन 2024, विशेष दिव्यांगांसाठी असलेली शर्यत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून झेंडा दाखवण्यात आला.
19 व्या मुंबई टाटा मॅरेथॉनचे मुख्य विजेतेपद इथोपियाच्या हायली लेमीनं पटकावलंय. श्रीनु बुगाथानं भारतीयांमधून पहिला क्रमांक पटकाविला आहे.
हायली लेमी बर्हानूने 2023 मध्येही टाटा मुंबई मॅरेथॉनचे विजेतपद पटकावलं होतं. त्यानंतर आता पुन्हा यावर्षी हायली लेमीने 2 तास सात मिनिटे 45 सेकंदांमध्ये ही मॅरेथॉन पूर्ण केली.
ऑलिम्पिक पदक विजेती आणि दोन वेळची जगज्जेती पोल व्हॉल्ट पटू केटी मून ही या टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 ची आंतरराष्ट्रीय ॲम्बेसेडर होती