अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्यात आला. याची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्सचा बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने घेतली आहे. त्याने एक फेसबूक पोस्ट केली आहे.

Apr 15,2024


अनमोलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, मी सलमानच्या घरावर गोळीबार करायला सांगितला. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग होती. पुढची गोळी घरावर नसेल.


अनमोलने आपल्या पोस्टमध्ये सुरुवातीला ओम जय श्री राम, जय गुरुजी जम्भेश्वर, जय गुरु दयानंद सरस्वती, जय भारत... अत्याचाराविरोधात युद्ध हवं असेल तर आम्ही तयार आहोत.


पुढे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, सलमान हा एक फक्त ट्रेलर होता, यावरुन तू आमची ताकद किती आहे हे समजशील'


'तू दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलला देव समजतोस, त्यांच्या नावाचे आम्ही दोन कुत्रे पाळले आहेत. जास्त बोलण्याची आम्हाला सवय नाही'


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्सचा भाऊ अनमोल अमेरिकेत लपला आहे. लॉरेन्सप्रमाणेच अनमोलवरही भारतात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.


लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई हे दोघं मऊ पंजाबमध्ये राहाणारे आहेत. कॉलेजमध्ये असताना या दोघांनी सोपू नावाची एक गँग बनवली होती.

VIEW ALL

Read Next Story