नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये मासे खाणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. पण कोणत्या मार्केटमध्ये मासे स्वस्त आणि ताजे मिळतात अशा प्रश्न अनेकांना पडतो.
एवढंच नाही तर, डॉक्टर देखील निरोगी शरीरासाठी मासे खाण्याचा सल्ला देतात. मासे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत.
शिवाय अनेकांना याची चव विशेष आवडते. मुंबईमध्ये अनेक प्रकारचे मासे बाजारात विकण्यासाठी आहे पण काही बाजारांमध्ये मास्याचे दर जास्त असल्याने कित्येक लोकं मासे खाणं टाळतात. पण मुंबईमध्ये काही असे ‘मासळी बाजार’ आहेत जेथे फार कमी रुपयांमध्ये मासे मिळतात.
भाऊचा धक्का हे मुंबईतील सर्वात मोठं फिश मार्केट आहे. भाऊचा धक्का या बाजारात ग्राहकांना परवडणाऱ्या स्वस्त दरात मासे खरेदी करता येतात. सकाळी येथे माशांवर बोली देखील लागते. पहाटेपासून येथे व्यवहाराला सुरुवात होते.
सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेला ससून डॉक सर्वात जुना आणि सर्वात मोठा फिश मार्केट आहे. याठिकाणी मासे परवडणाऱ्या दरात मिळतात.जर तुम्हाला स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीचे मासे खरेदी करायचे असतील तर तुम्ही येथे नक्कीच भेट दिली पाहिजे.
क्रॉफर्ड फिश मार्केट प्रचंड जुनं आणि प्रसिद्ध फिश मार्केट आहे. एवढंच नाही तर, क्रॉफर्ड फिश मार्केटमध्ये माशांचे दर देखील परवडणारे असतात. या ठिकाणी मासे खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते.
सायन मार्केट मुंबईतील एक मासळी मार्केट आहेत. तुम्ही येथे कमी प्रमाणात मासे देखील खरेदी करू शकता. सायन मार्केटमध्ये देखील अनेक प्रकारचे मासे असतात.
दादर फिश मार्केट मार्केट स्टेशनच्या अगदी जवळ आहे. याठिकाणी फळं, भाज्या आणि फिश मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मासे परवडणाऱ्या दरात असतात. रविवारी मासे खरेदी करण्यासाठी दादर फिश मार्केटमध्ये मासे प्रेमींची मोठी गर्दी जमते.