दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग करण्यात येतो. मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे व्यावसायिक जगतात नवीन वर्षाला सुरुवात होते.
2008 पासून, सलग 15 पैकी 12 वर्षे मुहूर्ताचे व्यवहार हे हिरव्या रंगावर बंद झाले आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजार 12 नोव्हेंबरला दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंग असणार आहे.
ब्लॉक डील विंडो ही 5:45 वाजता उघडणार असून संध्याकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत बाजारात सामान्य गुंतवणुकदर गुंतवणूक करु शकणार आहे. तर संध्याकाळी 6.20 ते 7.05 वाजेपर्यंत कॉल ऑक्शन सेशन आणि क्लोजिंग सेशन संध्याकाळी 7.15 ते 7.25 वाजेपर्यंत असणार आहे.
रिलायन्स सिक्युरिटीजनुसार, (Reliance Securities) मुहूर्त ट्रेडिंगमध्ये अंबुजा सिमेंटचा शेअर गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरणार आहे. ब्रोकरेज फर्मनुसार, या शेअरसाठी 495 रुपयांचे टार्गेट आहे. यात गुंतवणूक केल्यास 18 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळण्याची अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मोटोकॉर्पचा शेअर तुम्ही खरेदी करु शकता. ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 3,620 रुपयांचा टार्गेट देण्यात आलं असून त्यातून 14 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न मिळतील असा अंदाज आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँक एक चांगला ब्रँड असून या शेअरसाठी 105 रुपयांचे टार्गेट आहे. यातून 27 टक्के अधिक रिटर्न मिळू शकतं असं सांगण्यात आलं आहे.
एचडीएफसी बँकेचे शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास जवळपास 19 टक्के रिटर्न मिळतील असा अंदाज आहे.
एलटीआय माईंडट्री कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी 5,925 रुपयांचे टार्गेट ठेवण्यात आलं आहे. हा शेअरमधून 15 टक्के रिटर्न मिळतील.
हॅप्पीएस्ट माईड्स कंपनीच्या शेअरसाठी 960 रुपयांचे टार्गेट आहे. हा शेअर 16 टक्के फायदा करुन देण्यात यशस्वी होईल असा अंदाज आहे. (Disclaimer : गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. झी 24 तास तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा किंवा नुकसानीला जबाबदार नाही.)