ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मिळणारा वडापाव म्हणजे कुंजविहारचा वडापाव. हा वडापाव मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव पैकी एक आहे. हा वडापाव आकाराने मोठा असल्यामुळे एक खाल्ला तरी पोट भरून जातं.
विलेपार्ले येथे मिळणारा सम्राट वडापावच एक वेगळचं महत्त्व आहे. वडा पावाचे वैशिष्टय म्हणजे वडा पाव सोबत मिश्र भजींचाही आस्वाद घेता येतो. हा वडापाव खाण्यासाठी लांबून लोक येथे येतात.
गिरगावातील बोरकर वडापाव हा देखील मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव आहे. या वडापावसोबत मिळणारी चटणी खवय्यांना प्रचंड आवडते. गिरगाव चौपाटीवर देखील या वडापावचा आनंद घेता येतो.
मुलुंड पश्चिमेला असलेला हा वडापाव चांगलाच प्रसिद्ध आहे. मसाला वडापाव हे नाव वाचताच खूप तिखट झणझणीत असा वडापाव तुमच्या डोळ्यासमोर येईल मात्र हा वडापाव तिखट न खाणारे सुद्धा अगदी सहज खाऊ शकतात.
भायखळा रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस ग्रॅज्यूएट वडापाव मिळतो. गेल्या 17 वर्षांपासून लोक इथल्या वडापावचा अस्वाद घेत आहेत. हा वडापाव मुंबईमधील बेस्ट वडापावमधील एक आहे.
चटणीसाठी लोकप्रिय असणारा वडापाव म्हणजे ठाण्यातील गजानन वडापाव. हा वडापाव ठाणे स्टेशनच्या पश्चिमेस मिळतो. हा वडापाव खाण्यासाठी खवय्यांची चांगलीच गर्दी असते.
मुंबईतील फेमस वडापाव सेंटर म्हणजे भाऊचा वडापाव. या वडापावची खासियत म्हणजे आलं आणि नारळाची चटणी. पाटील भवन, एन. एस. रोड, स्टेशन रोड मुलुंड (पश्चिम) या ठिकाणी हा वडापाव खाण्यासाठी अनेक ठिकाणांहून लोक येतात.
प्रभादेवीमधील किर्ती कॉलेजजवळील अशोक वडापाव हा मुंबईतील प्रसिद्ध वडापावपैकी एक आहे. गेल्या 37 वर्षापासून येथे हा वडापाव विकला जातो. अनेक सेलिब्रिटींनी देखीय या वडापावचा अस्वाद घेतला. या वडापावची चटणी आणि त्यासोबतच इथं मिळणारा चुरा पाव देखील फेमस आहे.
सीएसएमटी स्थानकाचा सिग्नल ओलांडला की समोरच एक गर्दी पाहायला मिळते. ही सर्व गर्दी आराम वडापाव खाण्यासाठी असते. 1939 पासून हा वडापाव लोकप्रियता टिकवून आहे. साधा वडापाव, मेयोनिज वडापाव, बटर वडापाव, शेजवान वडापाव, चीज वडापाव असे विविध प्रकार इथं मिळतात.