सिद्धीविनायक मंदिर हे दादर जवळील प्रभादेवी परिसरात आहे. येथे दर्शनासाठी भाविकांची नेहमीच मोठी गर्दी पहायला मिळते.
तारापोवा मत्स्यालय हे मुंबईतील मरीन लाईन्स येथे आहे.
माऊंट मेरी चर्च हे वांद्रे येथे आहे. अनेक जण याला भेट देण्यासाठी येतात.
मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात गिल्बर्ट हिल ही टेकडी साडेसहा कोटी वर्ष जुनी आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून ही टेकडी तयार झालेली आहे.
वाळकेश्वर येथे कमला नेहरु पार्क आहे. येथील बुटाच्या आकाराची इमारत ही प्रमुख आकर्षण आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस हे मध्य रेल्वे मार्गावरील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. रेल्वे स्थानाकाची इमारत ही ऐतिहासिक वास्तू आहे.
दादर समुद्र किनाऱ्याजवळ चैत्यभूमीआहे. चैत्यभूमी हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळ आहे.
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलात कान्हेरी गुंफा या लेणी आबेत. या लेणी बौद्धकालीन आहेत.
मुंबईतील वांद्रे येथील वांद्रे किल्ल्ल्याना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.