क्षणात जमीनदोस्त

एकाएकी इरसालवाडीवर दरड कोसळल्यामुळं हा लहानसा आदिवासी पाडा क्षणात जमीनदोस्त झाला. घरांचं नुकसान झालं आणि अनेकांनी आपले सगेसोगयरे गमावले.

ट्रेकर्सची पहिली पसंती

अनेक ट्रेकर्सची पहिली पसंती असणाऱ्या या इरसालगडाच्या ट्रेकच्या सुरुवातीलाच लागणारं इरसालवाडी हे गाव आता नसल्यातच जमा झालं आहे. हे ठिकाण तुमच्यापासून किती दूर आहे माहितीये?

तुमच्यापासून किती दूर?

मुंबईपासून इरसालवाडी साधारण 56 किमी अंतरावर असून तास दीड तासात इथं पोहोतचा येतं. तिथूनच पुढे इरसालगडाच्या ट्रेकची वाट जाते. तर पुण्यापासून हे ठिकाण 104 किमी अंतरावर असून, इथं पोहोचण्यासाठी साधारण दोन तासांचा कालावधी लागतो.

मोरबे धरण

मोरबे धरणाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या इरसालवाडीपाशी आतापर्यंत अनेक ट्रेकर्सनी भेट दिली आहे. असं असलं तरीही हे क्षेत्र दरड प्रवण क्षेत्रात मात्र येत नसल्याचंही म्हटलं जात आहे.

कर्जतमधील पट्टा

इरसालगड का किल्ला कर्जत विभागात येतो. रायगडच्या उत्तर भागामध्ये येणाऱ्या या पट्ट्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं तेथे भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

अनेकजण विसावा घेतात

गावापासून गड जवळ असल्यामुळं गडाच्या पायथ्यापर्यंत गावातच अनेकजण विसावा घेण्याला प्राधान्य देतात.

हा एक सुळकाच

हा गड म्हणण्यापेक्षा एक सुळकाच आहे. इतिहासात त्याचा फारसा उल्लेख नाही.

असं म्हणतात की....

असं असलं तरीही 16 च्या शतकात जेव्हा शिवरायांनी कल्याण, भिवंडी- रायरीपर्यंतला मुलूख ताब्यात घेतला त्यातच हा भागही असल्याचा कयास लावला जातो.

इरसालगडाचा परिसर

इरसालगडाच्या शेजारीच प्रबळगडही असल्यामुळं या भागात येणाऱ्या ट्रेकर्सची या दोन्ही गडांना तितकीच पसंती.

VIEW ALL

Read Next Story