अनेकजणांनी आपल्या घरी शोभेसाठी मोरपीस लावला असेल.
मोरपीस खूप सुंदर दिसतो, त्यामुळे घरच्या सौंदऱ्यात भर पडते असे म्हणतात.
पण आता मोरपिसं विकणे अथवा विकत घेणे तुम्हाला महागात पडू शकते.
मोरपिसाची विक्री केल्यास आता कठोर कारवाई होणार आहे.
राज्य सरकारने मोराची पिसं अथवा साहित्य विक्रीला बंदी घातलीय.
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मोरांची शिकार करून मोरपिसांची विक्री करणं हा गुन्हा आहे.
मोराची शिकार करून मोरपिसे विकणाऱ्याला तीन वर्ष तुरुंगवास होऊ शकतो.
त्यामुळे कुठेही मोरपीस विक्री होत असेल तर वनविभागाला संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
यामुळे मोरांचे जीव वाचण्यास, त्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.