15 ऑक्टोबर पासून 23 ऑक्टोबरपर्यंत माऊलीचं अनोखं रुप पाहायला मिळणार
शारदीय नवरात्रोत्सवाला 15 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे.
राज्यभरात मंगलमय आणि उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे.
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पहिल्या माळेला विठुराय आणि रुक्मिणी हिरेजडीत मौल्यवान अलंकरांनी सजले.
विठुरायाला मस्तकी सोन्याचा मुकुट, कंठी कौस्तुभ मणी, हिऱ्याची कंगन, मोत्याचा हार, शिरपेच, मत्स्य जोड, मोत्याची कंठी, सोन्याची तुळशीमाळ अशा 21 प्रकारच्या ठेवणीतील अलंकारांनी सजविण्यात आलं
रखुमाईचं गोजिर रुप सोन्याचा मुकुट, हिरेजडित वाक्या तोडे, तानवड जोड, हिरेजडित जवेंच्या माळा, चिंचपेटी, लक्ष्मी हार, मोहराची माळ, पुतळ्याची माळ, सरी, हायकोल अशा 15 प्रकारच्या अत्यंत मौल्यवान अलंकाराने सजले होते.
दोन दिवसातील माऊलीचे रुप
घरी बसल्या घ्या विठ्ठल रखुमाईचं दर्शन
माऊलीचं साजरं रुप