Indian Railways Latest Update: जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि गोव्याला जाण्याचा बेत आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. मुंबई ते मडगाव दरम्यानच्या प्रवासादरम्यान ती 120 किमी प्रतितास वेगाने धावेल. ही सेमी-हाय स्पीड ट्रेन सुमारे 8 तासात 765 किमी अंतर कापेल. त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे.
मुंबई सीएसटीएमटी - पहाटे 5.25 वाजता सुटेल दादर - पहाटे 5.32 वाजता ठाणे - पहाटे 5.52 वाजता पनवेल - सकाळी 6.30 वाजता रोहा - सकाळी 7.30 वाजता खेड - सकाळी 8.24 वाजता रत्नागिरी - सकाळी 9.45 वाजता कणकवली - सकाळी 11.20 वाजता थिविम - दुपारी 12.28 वाजता मडगाव - दुपारी 1.15 वाजता
मडगाव येथून दुपारी 2.35 वाजता सुटेल थिविम -संध्याकाळी 3.20 वाजता कणकवली - संध्याकाळी 4.18 वाजता रत्नागिरी - संध्याकाळी 5.45 वाजता खेड - संध्याकाळी 7.8 वाजता रोहा - रात्री 8.20 वाजता पनवेल - रात्री 9 वाजता ठाणे - रात्री 9.30 वाजता दादर - रात्री 10.5 वाजता मुंबई सीएसटीएमटी - रात्री 10.25
मुंबई आणि गोवा या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे. सध्या दोन शहरांमधील सर्वात वेगवान रेल्वे CSMT - मडगाव तेजस एक्स्प्रेस आणि CSMT-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस आहे.
दोन्ही गाड्यांद्वारे हे अंतर कापण्यासाठी 8 तास 50 मिनिटे ते 9 तास लागतात. नवीन वंदे भारत 3 जून 2023 रोजी उद्घाटनाच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता मडगाव रेल्वे स्थानकावरून ट्रेनचा प्रवास सुरू होईल आणि 5 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
मुंबई ते मडगाव दरम्यान आठ डब्यांच्या ट्रेनला 11 थांबे असतील आणि 586 किमी अंतर कापण्यासाठी आठ तासांपेक्षा कमी वेळ लागेल. सेमी हाय-स्पीड वंदे भारतमुळे मुंबई आणि गोवा दरम्यानचा प्रवास एक तासाने कमी होणार आहे.
कोकण रेल्वेवर मुंबई ते मडगाव आणि मडगाव ते मुंबई अशी वंदे भारत एक्स्प्रेसचा (Vande Bharat Train) यशस्वी चाचणी अलिकडेच घेण्यात आली. आता सीएसएमटी ते मडगाव दरम्यान प्रीमियम वंदे भारत एक्स्प्रेसचा नियमित प्रवास 5 जून 2023 पासून सुरु होणार आहे.