लॉटरी विजेत्यांसाठी म्हाडाने दिली मोठी अपडेट, स्टॅम्प ड्युटी अन्...
महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकारणच्या (म्हाडा) 4000 घरांसाठी सोमवारी सोडत जाहीर करण्यात आली.
Mansi kshirsagar
Aug 16,2023
सोडत जाहीर झाल्यानंतर अर्जदारांसाठी म्हाडाने एक मोठी अपडेट दिली आहे.
म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढल्यानंतर विजेत्यांना कागदपत्रांती पूर्तता करण्यासाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत होत्या.
म्हाडाने एकल खिडकी योजनाअंतर्गंत म्हाडाच्या मुख्यालयातच सर्व प्रक्रिया पार पाडण्याची व्यवस्था करत आहेत.
म्हाडाने सोडतीनंतरच्या सर्व अनिवार्य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी म्हाडा कार्यालयातच मुद्रांक शुल्क आणि डिजिटल नोंदणी केंद्र सुरू करण्याचा विचार केला आहे.
लॉटरी विजेत्यांना मालमत्ता नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या गृहनिर्माण प्राधिकरण प्रक्रियेवर काम करत आहे. सर्व आगामी लॉटरी सोडतीसाठी ही सुविधा उपलब्ध असेल.