राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर नाशिकमध्ये आहे. सह्याद्री पर्वतरांगामधील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे.
महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेरचा आहे. समुद्रसपाटीपासून 1567 मीटर उंचीवर हा किल्ला आहे.
अनेक घाटरस्ते या परिसरात येऊन मिळतात. तिथून सहा घाटांवर लक्ष ठेवता येते म्हणून या गडाला सहाहेर नाव पडले. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन साल्हेर नाव पडले, असं म्हटलं जातं.
साल्हेर किल्ल्याला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व लाभले आहे. या किल्ल्याची लढाई मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाची मानली जाते.
साल्हेर गडावर परशूरामांचे मंदिर देखील आहे. या ठिकाणी त्यांनी तप केला होते. या मंदिरात त्यांच्या पायाचा ठसा असल्याचेही म्हटलं जातं
साल्हेर गडावरुनच त्यांनी बाण सोडून समुद्र मागे घेतला आणि कोकणाची निर्मिती केली, अशी आख्यायिका आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला.