महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सर्वात उंच कळसुबाई शिखर आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेला हा पर्वत आहे

May 08,2024


कळसूबाई पर्वत हा कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेत आहे


महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेत असलेल्या कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर इतकी आहे


कळसुबाई शिखर चारी बाजूंनी निसर्गाने नटलेलं आहे. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी कळसुबाई शिखर हे आवडतं ठिकाण आहे.


मुंबई आणि पुण्याहून कळसुबाई शिखरावर पोहोचता येतं. पावसाळी हंगामात इथं ट्रेकिंग करणं योग्य काळ असल्याचं मानलं जातं. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिना यासाठी चांगला आहे.


मुंबईहून पॅसेंजर पकडून इगतपूरीला आल्यावर तिथून बारी गाव गाठा. बारी गावाजवळून कळसुबाई शिखरावर ट्रेकिंगला सुरुवात करता येते.


कळसुबाई ही इथल्या गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान होतं. तिच्या मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची आठवण म्हणून त्या शिखराला कळसूबाई असं नाव दिलं.

VIEW ALL

Read Next Story