16 आमदारांपैकी पराभूत झालेले 9 आमदार कोण?

2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 16 आमदारांपैकी 9 आमदार पराभूत झाले. हे आमदार कोणते ते पाहूयात...

विकास ठाकरे

नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरुद्ध विकास ठाकरे पराभूत झाले. विकास ठाकरे हे काँग्रेसचे आमदार आहे.

राजू पारवे

रामटेकमधून पराभूत झाले. काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंकडून ते पराभूत झाले. हा पराभव भाजपासाठी धक्का मानला जातो.

मिहिर कोटेचा

उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाने उमेदवार संजय दिना पाटील यांनी मिहिर कोटेचा यांना पराभूत केलं.

महादेव जानकर

परभणी मतदारसंघातून महादेव जाणकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या संजय जाधव यांच्याकडून पराभूत झाले.

यामिनी जाधव

दक्षिण मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी यामिनी जाधव यांना पराभूत केलं. यामिनी जाधव या शिंदे गटाकडून लढत होता.

राम सातपुते

राम सातपुते यांना सोलापूरमधून प्रणिती शिंदेंनी पराभूत केलं. ही जागा काँग्रेसने जिंकली.

सुधीर मुनगंटीवार

प्रतिभा धनोरकर यांच्याकडून चंद्रपूरमधून भाजपाच्या तिकिटावर पराभूत झाले. मुनगंटीवार हे फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात वनमंत्री होते.

राजेश पाटील

पालघरमधून भाजपाचे हेमंत सावरा निवडून आले. या मतदारसंघात विद्यमान आमदार राजेश पाटील पराभूत झाले. ते बहुन विकास आघाडीकडून लढलेले.

शशिकांत शिंदे

साताऱ्यातून शरद पवार गटाचे विद्यमान आमदार शशिकांत शिंदे हे भाजपाच्या उदयनराजे भोसलेंकडून पराभूत झाले.

VIEW ALL

Read Next Story