सध्या संपुर्ण देश राममय झाला आहे. या भव्यदिव्य सोहळ्याचे केवळ अयोध्यामध्येच नव्हेतर सगळ्या जनतेमध्ये हा रामसोहळा साजरा केला जातोय.

मुख्य म्हणजे या सोहळ्याची क्रेझ लहान मुलांमध्येही पहायला मिळत आहे.

या निमित्ताने पुण्यातल्या काही चिमुकल्यांनी राम लक्ष्मण सिता आणि हनुमानाच्या वेशभूषेत फोटोशूट केलं आहे.

समोर आलेल्या फोटोमध्ये भगवान श्री रामचा अवतार घेतलेल्या चिमुकल्याने अगदी सुंदरप्रकारे साकारले आहेत.

आज अयोध्येत भगवान श्री रामाचा प्राण प्रतिष्ठासोहळा सुरु असून हे मंदिर सामन्य जनतेसाठी खुले होणार आहे.

या भव्यदिव्य सोहळ्याला केवळ राजकिय नेतेच नाहीतर सेलिब्रिटीदेखील हजर होते.

याच निमित्ताने या मुलांनी केलेली वेशभूषा पाहून सगळीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

VIEW ALL

Read Next Story