मुंबई आणि गुजरातमधील जो संघ जिंकणार तो 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अंतिम सामना खेळेल.
गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आजचा मुंबई विरुद्ध गुजरातचा सामना खेळवला जाणार आहे.
हार्दिकच्या नेतृत्वाखालील गुजरातला केवळ एकदाच मुंबईवर विजय मिळवता आला आहे.
मुंबई इंडियन्सने 3 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
या 3 सामन्यांचा निकाल पाहिला तर मुंबईचं पारडं जड असल्याचं दिसत आहे.
मुंबई आणि गुजरातने आयपीएलमध्ये एकूण 3 सामने खेळले आहेत.
मुंबई आणि गुजरातचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे हे आपण या क्वालिफायर-2 च्या पार्श्वभूमीवर जाणून घेणार आहोत
चेन्नई सुपर किंग्जने आधीच क्वालिफायर-1 मध्ये गुजरातला पराभूत करत अंतिम सामन्यातील स्थान निश्चित केलं आहे.
या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल तो आयपीएलमधून बाहेर पडणार आहे.
आयपीएल 2023 मधील हा 73 वा सामना क्वालिफायर-2 चा असणार आहे.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचा संघ आज आयपीएलच्या 16 व्या पर्वातील महत्त्वाचा समाना खेळणार आहेत.
दोन्ही संघ नेमके कितीवेळा आमने-सामने आले आणि कोण किती सामने जिंकलंय पाहूयात...