गेल्या दोन महिन्यात मौल्यवान धातूंनी ग्राहकांची बोबडी वळवली आहे. या धातूंनी आतापर्यंतचे भाववाढीचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले आहेत.
दोन्ही धातूंची घौडदौड सुरु असताना या आठवड्यात तुफान दरवाढील खऱ्या अर्थाने ब्रेक लागला.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 72,448 रुपये, 23 कॅरेट 72,158 रुपये, 22 कॅरेट सोने 66,362 रुपये झाले.
18 कॅरेट 54,336 रुपये, 14 कॅरेट सोने 42,382 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.
चांदीने दोन आठवड्यात मोठा दिलासा दिला. किंमती जैसे थे होत्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,000 रुपये आहे.
वर्ष 2015 मध्ये सोन्याचा भाव 24,740 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. या किंमतींन तिप्पट होण्यासाठी 9 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला.