5 लाख रुपयांना विकला जातोय हा चविष्ट मासा... बाजारात स्वस्तात मिळाला तर अजिबात सोडू नका
भारतात समुद्रातून जाळ्यात येणाऱ्या माशांमध्येच हा मासा दिसला की अनेकांचे डोळे चमकतात. हा मासा म्हणजे घोळ.
हलका सोनेरी आणि ब्रॉन्झ अशा एकंदर रंगाचा हा मासा त्याच्या गुणधर्मांमुळं कमालीचा प्रसिद्ध. गुजरातपासून महाराष्ट्रापर्यंतच्या सागरी सीमेत हा मासा आढळतो.
जास्तीत जास्त एक ते दीड मीटर लांबीचा हा मासा तब्बल 5 लाख रुपयांच्याही किमतीला विकला जातो. किंमक ऐकून धक्का बसला ना?
माशाच्या पोटात असणाऱ्या एका पिशवीचे अर्थात बोथाचे औषधी गुणधर्म असल्यामुळं त्याची किंमत इतकी जास्त आहे.
उपलब्ध माहितीनुसार शस्त्रक्रियेदरम्यान वापरले जाणारे धागे या बोथापासून तयार करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात या बोथाची मोठी किंमत आहे. इंग्रजीत याला फिश वॉव असंही म्हटलं जातं.
घोळ माशाचं मांस आणि त्यात असणारी एअर बॅग अर्थात बोथ यांची वेगवेगळी विक्री होते. एअर ब्लॅडर आणि घोळीचं मांस यामुळं या माशाची किंमत जास्त असते.
महाराष्ट्राच्या सागरी सीमेमध्ये आढळणारा हा मासा गुजरातचा राज्यमासा आहे.