निमित्त ठरलं ते म्हणजे सोमवती अमावस्या आणि दिवाळीचा माहोल.
सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर खंडेरायांची पालखी निघाली असून, नदीवर स्नानासाठी पालखीनं प्रस्थान ठेवलं.
दुपारी साडेबारा वाजता पवित्र कऱ्हा नदीवर श्री खंडोबा म्हाळसादेवीच्या मूर्तींना धार्मिक वातावरणात स्नान घालण्याचा योग योजला गेला
13 नोव्हेंबर रोजी, म्हणजेच सोमवारी दुपारी अडीचपर्यंत अमावास्येचा कालावधी आहे. ज्यामुळं जेजुरीत सोमवती यात्रेला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जेजुरीत दरवर्षी सबंध महाराष्ट्रातून भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी येतात. अनेकांचं कुलदैवत असणाऱ्या या आराध्य दैवतेचा पुजतात.
जेजुरी गडावर होणारी भक्तांची गर्दी, येळकोट येळकोट जय मल्हार हा जयघोष आणि भंडाऱ्याची उधळण.... ही सर्व दृश्य मन मोहणारी असतात.
जेजुरी गडावर आलं असता इथंच नजीकच्या कडेपठारावर जाण्याचीही प्रथा आहे.
जेजुरी गडाच्या तुलनेनं कडेपठाराचा चढ मात्र काहीसा थकवणारा आहे. पण, तरीही तिथून दिसणारी जेजुरी पाहणंही एक वेगळाच अनुभव.