माळशेजपासून काही अंतर पुढे आल्यानंतर मुरबाड मार्गावर पळू नावाचं एक गाव लागतं. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या या गावातून तुम्ही ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता
ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वाईमध्ये धोम धरण, फडणवीस वाडा अशी ठिकाणं तुम्ही पाहू शकता. परतताना इथला कंदी पेढा नक्की सोबत न्या....
इगतपुरी हे एक असं ठिकाण आहे, जिथं तुम्ही वर्षातून केव्हाही येऊ शकता. पुण्यापासून हे ठिकाण 247 किमीवर असून, इथं येण्यासाठी तुम्हाला 4 लागू शकतात.
पुण्यापासून 139 किमी अंतरावर असणाऱ्या माळशेज घाटात तुम्ही काही निवांच क्षणांचा आनंद घेऊ शकता. इथं अॅडवेंचर बाईक रायडिंगचा थरारही तुम्हाला अनुभवता येईल.
पुण्यापासून 288 किमी अंतरावर असणाऱ्या सापुतारा या गिरीस्थानाला भेट देणंही एक चांगला पर्याय असू शकतो.
पुण्यापासून 133 किमी अंतरावर असणाऱ्या तापोळा येथे निसर्ग पर्यटनाचे अनेक पर्याय तुम्ही अनुभवू शकता.