विमान प्रवास करताना अनेक नियम सक्तीने पाळले जातात. मग ते सामानाचे वजन असो किंवा सुरक्षा व्यवस्था.
अनेकदा प्रवाशांनी संबंधित नियमांचे पालन केले नाही तर त्यांना त्याचा भुर्दंड भरावा लागतो.
तुम्हाला आज अशा फळाविषयी सांगणार आहोत जे फळ विमानातून घेऊन जाण्यास सक्त मनाई केली जाते.
नारळ हे एक असं फळ आहे जे विमानातून घेऊन जाण्यास सक्त मनाई केली जाते. विमानातच नाही तर रेल्वे प्रवासादरम्यान हे फळ घेऊन जाण्यास सुद्धा अनेकदा मनाई केली जाते.
एअरलाईन्स नियमावलीनुसार नारळ हे फळ ज्वलनशील मानले जाते. सुकलेला नारळ तुम्ही विमान किंवा रेल्वे प्रवासादरम्यान सोबत घेऊन जाऊ शकत नाही.
नारळाला अनेकदा लवकर सडतो तसेच त्याला बुरशी लागते त्यामुळे विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना नारळ सोबत घेऊन जाता येत नाही.
नारळाशिवाय परदेशात विमानाने प्रवास करत असताना मांस, भाज्या सारख्या वस्तू सुद्धा तुम्ही नेऊ शकत नाही.
खाद्यपदार्थांप्रमाणे सेल्फ डिफेन्स आयटमसारखे म्हणजे पेपर स्प्रे, काठी तसेच रेजर, ब्लेड, नेल फाइलर आणि नेल कटर सारख्या वस्तू तुमच्याकडे असतील त्यादेखील चेक इन करताना तुमच्याकडून काढून घेतल्या जाऊ शकतात.
तुम्ही ज्या देशात जाण्यासाठी विमान प्रवास करत आहात, तेथील नियम एकदा वाचून घ्या. यामुळे तुमची गैरसोय टाळता येईल.