गावांच्या नावाच्या पुढे का लावतात 'पूर'? 99% लोकांना माहित नसेल यामागचे कारण


28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश असलेला भारत हा एक समृद्ध देश आहे.


प्रत्येक राज्यात अनेक जिल्हे आहेत. ज्यात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात. पण या गावांच्यामागे 'पूर' शब्द का लावला जातो?


जसे की नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, जयपूर, उदयपूर, कानपूर, रामपूर, रायपूर असे अनेक जिल्हे, गावं आहेत


पण तुम्हाला माहिती आहे का? या शहरांच्या शेवटी 'पूर' हा शब्द का येतो आणि त्याचा अर्थ काय?


खरंतर शहरांच्या नावापुढे 'पूर' शब्द लावण्याची परंपरा खुप पूर्वीपासून चालत आली आहे.


'पूर' हा शब्द मूळ संस्कृत आहे. ज्याचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदात बघायला मिळतो.


पूर्वी गावातल्या एखाद्या प्रसिद्ध व्यक्ती किंवा घटनेवरून त्या ठिकाणाला नाव द्यायची प्रथा होती आणि त्यापुढे 'पूर' लावले जायचे.


जसे गुरू गोरक्षनाथ यांच्यावरून गोरखपूर, सोळा गावं असलेले सोलपूर, महालक्ष्मीने तिथे कोल्हासुराचा वध केला म्हणून कोल्हापूर


आणखी विचार केला तर 'पूर' शब्द असणाऱ्या या शहरांमध्ये आपल्याला किल्लेही बघायला मिळतात. जसे जयपुर, उदयपुर

VIEW ALL

Read Next Story