सणासुदीच्या काळात अनेक शॉपिंग साईट्स ग्राहकांना विविध उत्पादनांवर मोठी सूट देतात. म्हणून ग्राहक थेट दुकानातून खरेदी करण्याऐवजी ऑनलाईन शॉपिंगवर जास्त भर देतात.
पण तुम्ही कधी विचार केलाय का की तुमचे उत्पादन ज्या बॉक्समधून येते तो बॉक्स ब्राऊन (तपकिरी) रंगाचाच का असतो?
ऑनलाईन डिलिव्हरीसाठी वापरण्यात येणारे बॉक्स हे कार्डबोर्डचे किंवा पुठ्ठ्याचे बनलेले असतात. डिलिव्हरी बॉक्ससाठी वापरण्यात येणार बॉक्स हा संपूर्ण कॉर्पस कागदाचा बनलेला असतो.
झाडापासून कागदाची निर्मिती होते. जे कागद ब्लीच केलेले नसतात त्यांचा नैसर्गिकपणे रंग हा तपकिरी असतो.
कागद हा नैसर्गिकपणे झाडाच्या लाकडापासून, देठ आणि सालीपासून बनवला जातो. जर हा कागद पांढरा किंवा इतर कोणत्याही रंगाचा करायचा असेक तर त्याला ब्लीच करावे लागते.
ब्लिचिंग प्रोसेस ही खूप महाग असते. त्यामुळे ऑनलाईन कंपन्या ब्राऊन रंगाचेच डिलिव्हरी बॉक्स वापरतात जो कमीत कमी पैशात बनवला जातो.
Amazon आणि Flipkart सारख्या ऑनलाईन डिलिव्हरी कंपन्या या स्वस्त दारात ग्राहकांना वस्तू देण्यासाठी ओळखल्या जातात. तसेच या कंपन्या ग्राहकांकडून पॅकिंगसाठी पैसे आकारत नाहीत.
त्यामुळे डिलिव्हरी कंपन्यांना ब्लीचिंगवर पैसे खर्च न करता कमीत कमी पैशात बॉक्स विकत घेऊन त्याचा उपयोग करतात. म्हणून अधिकतर कंपन्या ब्राऊन रंगाच्या डिलिव्हरी बॉक्सचाच वापर करतात.