लग्न आणि साखरपुड्यात वर वधू एकमेकांना अंगठी घालतात. पण ती अंगठी ही अनामिका बोटातच घातली जाते. परंतु यामागचं कारण काय याबाबत जाणून घेऊयात.
साखरपुड्याची अंगठी ही नेहमी वर वधूंच्या डाव्या हातातील अनामिका बोटात घातली जाते.
डाव्या हाताच्या दुसऱ्या बोटाला 'अनामिका' असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार हे बोट प्रेम, उत्साह, तेज यांच्याशी संबंधित आहे.
अनामिका हे बोट जोडप्यामधील प्रेम दर्शवते.
डाव्या हातात लग्नाची अंगठी घालण्याचा ट्रेंड रोमन काळापासूनचा आहे.
डाव्या हाताचा थेट हृदयाशी संबंध असतो आणि डाव्या हातात अंगठी घातल्याने थेट हृदयाशी संबंध जुळतो असं रोमन लोकांचं म्हणणं होतं.
ज्योतिषशास्त्रानुसार लग्न आणि साखरपुड्यात घातली जाणाऱ्या अंगठीचा आकार गोल असावा.
वैवाहिक संबंध चिरंतन राहण्यासाठी अनामिका बोटात गोल अंगठी घालावी अशी मान्यता आहे.
Desclaimer
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)