लग्नानंतर महिला नाकात नथ का घालतात? डावं नाक का टोचतात?
लग्नानंतर मंगळसूत्र, पायात पैंजण अन् जोडवे महिला घालतात. त्यासोबत नाकात नथ आणि तेही डाव्या बाजूला असं का ते तुम्हाला माहितीये का?
आयुर्वैद अभ्यासक शुभांगी चौहान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय.
ज्यात त्यांनी नथ डाव्या बाजूला घालण्याचे फायदे सांगितलंय.
आयुर्वेदानुसार नाकपुडी उघडण्याच्या जवळ मज्जातंतूंचे पुंजके असतात जेव्हा नाकाच्या डाव्या बाजूला छिद्र केलं जातं तेव्हा या मज्जातंतू उत्तेजित होतात.
गर्भाशयाला निरोगी बनवण्यात मदत मिळते.
मासिक पाळीच्या वेदना आणि प्रसूती वेदना देखील कमी करण्यात फायदेशीर ठरते.
आपल्या शरीरात काही ऍक्युप्रेशर पॉईंट असतात, यापैकी डाव्या नाकावरील पॉईंट हा थेट प्रजनन प्रणालीशी जोडलेला असतो.
नथ धारण केल्याने सौंदर्य वाढते. सोळा श्रृंगारमध्ये एक नथ असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालंय.