तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की रस्त्यावरील भटके कुत्रे हे गाड्यांचा पाठलाग करतात.
परंतु यामागे नेमकं कारण काय असू शकत याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
जेव्हा कुत्र्यांच्या आजूबाजूला कोणतीही गाडी येते तेव्हा त्यांना स्वतःच्या सुरक्षेची चिंता होते.
बऱ्याचदा कुत्रे गाडयांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी भुंकतात.
तसेच अनेकदा गाडी घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाता. अशावेळी तेथील भटकी कुत्री तुमच्या गाडीच्या टायरवर घाण करतात.
मग जर तुम्ही तीच गाडी दुसऱ्या परिसरात घेऊन जात असाल तर टायरला लागलेल्या घाणीच्या वासाने त्या परिसरातील कुत्र्यांना वाटते की त्यांच्या भागात कोणता दुसरा कुत्रा आला आहे. म्हणून ते भुंकतात आणि पाठलाग करतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)