भीती वाटली किंवा एखादा परफॉर्मन्स पाहून अंगावर शहारे आल्याचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतलेला आहे.
एखादी टोकदार वस्तु टोचल्यावरही अंगावर शहारे येतात.
किंवा एखादी अनपेक्षित घटना किंवा प्रेरणादायक गोष्ट वाचून अंगावर शहारे येतात.
गुजबम्प्स म्हणजे अंगावर शहारे हे कधीही येऊ शकतात. पण त्याचे कारण तुम्हाला माहितीये का
पाइलोइरेक्शनच्या प्रक्रियेमुळं अंगावर शहारे येतात. अशावेळी शरीरावरील मुख्यतः हातावरील केस काहीवेळासाठी उभे राहतात.
अंगावर शहारे येणे हे शरीरासाठी फायदेशीर असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.
अंगावर येणाऱ्या शहाऱ्यांचा आवाज आणि दृश्यांशी जवळचा संबंध आहे
मेंदूच्या एक भाग इमोशनल ब्रेन धोक्याच्या आवाजावर प्रतिक्रिया देतो. मेंदूला वाटते हे काही सामन्य नाही कोणतीतरी क्रिया आहे. त्यामुळं शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.
अशावेळी शरीरावर शहारे येतात.