व्हिस्कीच्या बाटलीवर का लिहिलेली असतात वर्षं, जाणून घ्या यामागील फंडा

व्हिस्कीचं वय

व्हिस्की पिणारे ती किती जुनी आहे याकडे विशेष लक्ष देत असतात. यामुळेच प्रत्येक बाटलीवर तिचं वय म्हणजेच ती किती वर्षं बॅरलमध्ये ठेवली होती हे लिहिलेलं असतं.

व्हिस्की जितकी जुनी असेल तितकी चांगली असं म्हटलं जातं. पण खरंच असं असतं का?

किती वर्ष जुनी व्हिस्की चांगली?

व्हिस्कच्या बाटलीवर लिहिलेल्या 10,12 आणि 22 Years यांचा नेमका काय अर्थ असतो आणि किती वर्ष जुनी व्हिस्की चांगली असते हे जाणून घ्या.

बॅरलमध्ये ठेवली जाते व्हिस्की

GQIndia नुसार, स्पिरीटला व्हिस्की बनवण्यासाठी तिला लाकडाच्या कंटेनरमध्ये ठेवलं जातं. बॅरलमध्ये व्हिस्कीचं वय वाढल्यास तिची चव आणि अफेंट यात फार बदल होतो.

जितकं वय जास्त, तितकी किंमतही जास्त

व्हिस्कीचं वय जितकं जास्त असेल तितकी तिची किंमतही जास्त असते. व्हिस्की जेव्हा बॅरलमधून बाहेर काढून बाटलीत भरली जाते तेव्हा तिची एजिंग प्रोसेस तिथेच थांबते.

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञांनुसार, 12 वर्षं बॅरेलमध्ये ठेवलेली व्हिस्की सर्वात चांगली मानली जाते. पण काहींचं म्हणणं आहे की, 20 ते 22 वर्षं बॅरेलमध्ये ठेवलेली व्हिस्की सर्वोत्तम असते.

10 ते 20 वर्षं जुनी व्हिस्की

तर अमेरिकन व्हिस्कीमध्ये 5 ते 10 वर्षं जुनी व्हिस्की चांगली निवड मानली जाते. स्कॉटलंडची व्हिस्की असेल तर 20 वर्षं जुनी चांगली असते, कारण वातावरणात तिची चव बदलत जाते.

(ही माहिती फूड अँड वाइन एक्स्पर्ट्सच्या हवाल्याने देण्यात आली आहे. यामधून मद्यपानासाठी प्रवृत्त करण्याचा हेतू नाही)

VIEW ALL

Read Next Story