जर तुम्हाला कोणी विचारले की जगातील सर्वात महाग तांदूळ कोणता आहे, तर तुम्ही बासमतीचे नाव घ्याल.
पण तांदळाची एक जात इतकी महाग आहे की त्या किमतीत स्मार्टफोन घेता येईल.
किनमेमाई असं या तांदळाचे नाव आहे. याची किंमत सुमारे 12,000 रुपये प्रति किलो आहे.
हा भात त्याच्या चव, सुगंध आणि पौष्टिकतेसाठी प्रसिद्ध आहे. हा तांदूळ शिजवण्यापूर्वी धुण्याची गरज नाही.
हा तांदूळ अगदी हलका आणि पचण्याजोगा आहे. तसेच हा तांदूळ लवकर शिजतो.
नियमित तांदळाच्या तुलनेत किनमेमाई तांदळात 1.8 पट जास्त फायबर आणि 7 पट जास्त व्हिटॅमिन बी-1 असते.
या तांदळात 6 पट जास्त लिपोपोलिसॅकराइड असते, जे नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवणारे आहे.
किनमेमाई व्यतिरिक्त कोशीहिकारी, पिकमारू, गुन्मा, नागानो, निगाता या जपानमधील तांदळाच्या खूप महाग आणि चांगल्या जाती आहेत.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)