जर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तुमचे शरीर उर्जा गमावू लागेल आणि तुम्हाला सतत थकवा जाणवू लागेल.
प्रथिनांच्या कमतरतेमुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही वाईट परिणाम होतो. शरीर मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीन अत्यंत आवश्यक असतात.
पनीर हा तर प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. एक कप म्हणजे 220 ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 28 ग्रॅम प्रथिने असतात.
ओट्स हे वनस्पती-आधारित प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. ओट्सच्या 1/2 कप सर्व्हिंगमध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रथिने असतात.
होय, काबुली चण्यामध्येही प्रोटीनचे प्रमाण चांगल्या प्रमाणत असते. 160 ग्रॅम शिजवलेल्या कबुली चणामध्ये सुमारे 15 ग्रॅम प्रथिने असतात.
170 ग्रॅम ग्रीक दह्यामध्ये 15 ग्रॅम प्रोटीन असते. याचमुळे तुम्ही याचे नियमित सेवन केले तर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता भासणार नाही.
जर तुम्ही वेगवगेळ्या पद्धतींच्या डाळींचे नियमित सेवन सुरू केले तर तुमच्या शरीराला प्रोटीन चांगल्या प्रमाणात मिळू लागतात. एक कप डाळीमध्ये अंदाजे 18 ग्रॅम प्रथिने मिळू शकतात.
हाय प्रोटीन आहाराच्या यादीमध्ये अंड्यांचा समावेश केला जातो. प्रत्येक अंड्यामध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रथिने असतात, ज्यामुळे ते प्रथिनांचा उत्तम स्रोत बनतात. (All Photos: Freepik)