उपाशीपोटी चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा होईल पोटदुखी

Mar 19,2024

पेरू

पेरू हे असेच एक फळ आहे जे सगळ्यांनाच खूप आवडते. पण लक्षात ठेवा की त्याच्या बियांमुळे अनेकांच्या पोटात वेदना होतात. q

चहा आणि कॉफी

उपाशीपोटी चहा प्यायल्याने गॅस किंवा एसिडिटीची समस्या होऊ शकते. चहा किंवा कॉफी पिताना नेहमी चपाती किंवा बिस्किटे खा, यामुळे तुमचे पोट चांगलं राहिल.

टोमॅटो

तुम्ही जर उपाशी पोटी टोमॅटो खात असाल तर थोडं थांबा कारण टोमॅटोमध्ये एसिडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उपाशी पोटी टोमॅटो खाल्लं असता त्याचा पोटाला त्रास होतो.

मादक पदार्थ

दारू ही शरिराला अपायकारक असतेच मात्र उपाशी पोटी दारुचे सेवन केले तर त्याचा अधिक त्रास होतो. तसेच पोटात जळजळ होते.

केळी

केळं खाण्याची अनेकांना सवय असते. पण उपाशी पोटी केळं खाल्ल्यास त्याचा शरीराला त्रास होण्याची शक्यता असते.

तिखट खाणं

रिकाम्या पोटी मसालेदार अन्न खाल्ल्याने देखील पोटात अस्वस्थता येते. ज्यामुळे एसिडिटी किंवा वेदना सुरू होऊ शकतात.

VIEW ALL

Read Next Story