गर्भधारणेची भीती वाटतेय? हा आहे एक प्रकारचा मानसिक आजार

टोकोफोबिया ही एक भीती आहे ज्यामध्ये महिलांना गरोदर राहण्यास आणि मुलाला जन्म देण्यास घाबरतात.जर तुम्हाला देखील ही लक्षणे दिसत असतील तर जाणून घ्या उपाय.

ही भीती मागील काही वाईट अनुभव, आरोग्य समस्या , मानसिक ताण किंवा भीतीदायक कथांमुळे वाटू शकते. गर्भवती होण्याची चिंता वाटणे , मुलाला जन्म देण्याच्या विचारांनी घाबरून जाणे आणि गर्भधारणा टाळण्यासाठी उपाययोजना करणे.

पण या भीतीवर अनेक उपायदेखील केले जातात.

टोकोफोबिया टाळण्यासाठी मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मदतीने थेरपी घेऊ शकतात.

गर्भधारणा आणि प्रसूतीबद्दल योग्य माहिती मिळवल्यास भीती कमी होऊ शकते.

त्याचबरोबर महिला त्यांच्या मनातील भीती कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर करू शकतात ज्यामुळे त्या मानसिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतात.

काही प्रकरणांमध्ये डॉक्टरांची मदत आणि औषधे आवश्यक असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे गरजेचे आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story