सहसा आईस्क्रीम खाल्लं की अनेकांनाच सर्दी पडसं सतावण्याची भीती वाटते.
हे असं का बरं होतं? आईस्क्रीम खाल्लं की कोणाचा घसा खवखवतो, कोणाला सर्दी होते, खोकलाही होतो. यामागचं कारण म्हणजे आईस्क्रीम खाण्याची पद्धत. अर्थात चुकीची पद्धत.
अनेकजण आईस्क्रीम चुकीच्या पद्धतीनं म्हणजेच थेट जीभेवरून अन्ननलिकेत.... अशाच काहीशा पद्धतीनं खातात.
मुळात आईस्क्रीम खाताना ते योग्य पद्धतीनं खाल्ल्यास सर्दी आणि खोकला दूरच राहतो.
आईस्क्रीम खातना आधी ते जीभेवर ठेवून त्यानंतर तोंडातील लाळ त्यात मिसळू द्यावी आणि मग जीभेवरच ते पूर्णपणे वितळल्यानंतर गिळावं असा सल्ला तज्ज्ञ देतात.
आईस्क्रीम अशा पद्धतीनं खाल्ल्यास शरीराला कोणतंही नुकसान पोहोचत नाही. बरं आईस्क्रीन खाल्ल्यावर साधं पाणी प्यावं. (वरील माहिती जाणकारांच्यांं सल्ल्यानुसार असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)